प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत वागदे येथील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या मार्फत कै. राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप रघुनाथ चौकेकर यांनी वागदे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत, तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे, पत्रकार गिरीश परब, जितेंद्र गावडे, संस्था सदस्य अरुण चौकेकर, ऋषिकेश धुरी, बाळकृष्ण गावडे आणि शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना हे रेनकोट वाटप करण्यात येणार असून या सामाजिक उपक्रमाची सुरुवात त्यांनी कणकवली तालुक्यातील शाळांपासून केली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात येणार आहे. संदीप चौकेकर हे आपल्या प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम समाजात राबवित असतात. कोरोना काळातही त्यांनी रुग्णसेवेमधून आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली होती. या रेनकोट वाटपाच्या उपक्रमामुळे प्राणजीवन सहयोग संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!