खारेपाटण (प्रतिनिधी): मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ६६ वरील खारेपाटण येथील अनेक कामे अजून अपूर्ण असून सदर कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी हायवे प्राधिकरणाच्या संबधीत अधिकरयांची नुकतीच खारेपाटण येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, देवेंद्र इसवलकर ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी खारेपाटण येथील महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम उपवीभाग कार्यालय वर्ग – २ खारेपाटण चे अभियंता अतुल शिवणीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महामार्गावरील अपूर्ण कामांची माहिती दिली. यावेळी हायवे प्राधिकरणाचे ठेकेदार पांडे, सहाय्यक अभियंता बी जी कुमावत आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. तर खारेपाटण महामार्गावरील अपूर्ण कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन अधिकारी वर्गाने पाहणी केली. खारेपाटण मधुबन हॉटेल येथील एकेरी मार्गामुळे चकीच्या मार्गिकेने एस टी बस व इतर वाहने खारेपाटण येथे येत असल्याने धोकादायक वळणावर अपघात होण्याची दाट शक्यता असून येथे ब्यारिकेट्स लावण्यात यावेत. खारेपाटण चेकपोस्ट येथून डायव्हरशन देण्यात यावे.खारेपाटण वरचा स्टँड ते खारेपाटण रेल्वे स्टेशन कडे चिंचवलीकडे जाणारा हायवे ला जोडून सर्व्हिस रस्ता तयार करण्यात यावा. तसेच रामेश्वर नगर खारेपाटण ते खारेपाटण वरच्या स्टँड पर्यंत डाव्या बाजूने सर्व्हिस रोड तयार करण्यात यावा. खारेपाटण हायवे वरील बॉक्सवेल रद्द करून त्याठीकाणी ओव्हर फ्लाय ब्रीज किंवा सर्कल बांधून मिळावे. खारेपाटण राष्ट्रीय महामार्गावरील साईट गटारे पक्की बांधून देण्यात यावीत. तसेच खारेपाटण शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर योग्य दिशादर्शक फलक व रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला रात्रीचे पेटणारे दिवे लावण्यात यावेत.व जे स्ट्रिट लाईट बंद आहेत त्या तातडीने सुरू करण्यात यावे.आदी विवीध मागण्या खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर व माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी हायवे प्राधिकरणाकडे केल्या आहेत. महाराष्ट्र शासन बांधकाम विभाग खारेपाटण उपविभाग कार्यालयाचे अभियंता अतुल शिवनिवार व हायवे प्राधिकरणाचे अधिकारी पांडे यांनी येत्या पावसाळ्यापूर्वी सर्व अपूर्ण कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन खारेपाटण ग्रामस्थांना दिले.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण मधील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा












