सिंधुदुर्गवासियांना टोलमाफी मिळाल्याशिवाय सिंधुदुर्गातील टोलनाका सुरू करायला देणार नाही

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा

काम अपूर्ण असतानाही हातिवलेतील टोलनाका पुन्हा सुरु झाल्याने निलेश राणेंची स्टंटबाजी उघड

राजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील हातीवले टोलनाका डिसेंबर मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमोर आंदोलनाची स्टंटबाजी करून हातीवले टोलनाका बंद पाडल्याचा आव आणला. मात्र हातिवले टोल नाक्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारी कंपनी राणेंचीच असल्याने आता पुन्हा एकदा हातिवले येथे टोल वसुली सुरु करण्यात आली आहे. राणेंनी राजापूर येथील जनेतेची फसवणूक केली असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोल नाका सुरु करण्याचा घाट घातला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळाल्याशिवाय सिंधुदुर्गातील टोल नाका शिवसेना सुरू करायला देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!