साहित्यिक कृष्णराव केळुसकर यांच्या ग्रंथसंपदाचे १४ एप्रिल रोजी पुनर्प्रकाशन

नाईक मराठा मंडळ मुंबई चे आयाेजन ; कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देशाचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य तथा अपेक्षित सन्मानापासून अपेक्षित राहिलेले महान साहित्यिक कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या ग्रंथसंपदाचे पुनर्प्रकाशन १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील गुलमोहर हॉटेल येथील श्री महालक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा राजन गवस आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य प्रा दिनेश पाटील यांच्याहस्ते होणार आहे. नाईक मराठा मंडळ मुंबई यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर तर स्वागताध्यक्ष नाईक मराठा मंडळ संयुक्त कार्यवाह किरण नाईक हे असणार आहेत. यावेळी प्रकाशित करण्यात येणारे साहित्य मोफत देण्यात येणार असल्याचे किरण नाईक यांनी सांगितले. यावेळी उप कार्याध्यक्ष नयन सोनुर्लीकर, सहकार्यवाह न्हानु नाईक, संयुक्त कार्याध्यक्ष किरण नाईक, खजिनदार विजय अणावकर, वधू वर सूचक संचालक राजश्री कबरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!