निवासी उपजिल्हाधिकारीपदी मच्छिंद्र सुकटे ; कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर मच्छिंद्र सुकटे यांची आणि कुडाळ प्रांताधिकारी या पदावर ऐश्वर्या काळूशे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांची पुणे येथील अन्न धान्य वितरण अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.

error: Content is protected !!