देवगड न.पं.नगरसेवक रोहन खेडेकर अपात्र ; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविराेधात न्यायालयात दाद मागणार

सत्ताधारी गटनेते संतोष तारी यांची माहिती

देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे न.पं.मधील सत्ताधारी नगरसेवकांनी घराचे अवैध बांधकाम केल्याप्रकरणी माजी नगरसेवक योगेश चांदोस्कर यांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी सत्ताधारी नगरसेवक रोहन खेडेकर यांनी अपात्र ठरवित असल्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून न.पं.प्रशासनाला प्राप्त झाली आहे अशी माहिती प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी यांनी दिली .दरम्यान या निर्णयामुळे देवगड जामसंडे न.पं.मध्ये भाजपाचे ८ व सत्ताधारी ठाकरे गटाचे ८ असे समसमान बलाबल झाले आहे.एक नगरसेवक अपात्र झाल्याने भविष्यात देवगड जामसंडे न.पं.मध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागू असे सत्ताधारी गटाचे गटनेते संतोष तारी यांनी बोलताना सांगीतले.

देवगड जामसंडे न.पं.प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी मौजे जामसंडे ता.देवगड येथील सर्व्हे नं.४८६/३/२६/५ या बिनशेती प्लॉटींग मधील भुखंड क्र १४ क्षेत्र ३.०६.०० चौ.मी.या क्षेत्रामध्ये आपल्या नगरसेवकपदाचा गैरवापर करून नमुद जागेमध्ये न.पं.अधिनियमाचा भंग करून बेकायदेशीर रित्या इमारत बांधलेली आहे.सदर बांधकाम करताना त्यांनी न.पं.देवगड जामसंडे यांची कोणतीही परवानगी न घेता आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करत अवैध बांधकाम करून न.पं.ची फसवणुक केलेली आहे.त्यामुळे रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे असा तक्रारी अर्ज योगेश चांदोस्कर यांनी ७/११/२०२२ रोजी जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांच्याकडे दाखल केला होता.सदर तक्रारी अर्जावरून अनर्ह अर्ज क्र ३/२०२२ दाखल करण्यात आला.त्यानुसार जिल्हाधिकारी सिंधदूर्ग यांच्याकडे या प्रकरणाची महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगीक नागरी अधिनियम १९६५ चे ४४(१)(ई) अन्वये वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली.त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन अधिकारी नगरविकास शाखा सिंधुदूर्ग यांनी मुख्याधिकारी न.पं.देवगड जामसंडे यांना तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याबाबत कळवि ले.त्यानुसार देवगड जामसंडे मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालामधील माहि तीनूसार, दि १४/११/२०२२ रोजी बीट निरीक्षक , नगर अभियंता देवगड यांनी समक्ष जागेवर पंचा समक्ष पंचयादी घालून विषयांकीत बांधकामाची स्थळ पाहणी केली.या स्थळ पाहणी अहवालामध्ये नगरसेवक रोहन खेडेकर व त्यांचे भाऊ उमेश खेडेकर यांनी जामसंडे ता.देवगड येथील स.नं.४८६/३/२/५ या भुखंडामध्ये सी.सी.तळमजल्याचे बांधकाम विना परवाना केल्याचे दिसून येते असे स्पष्टपणे नमुद केले आहे.तसेच रोहन खेडेकर यांनी न.पं.देवगड यांच्या कार्यालयात दि ३०/६/२०२२ रोजी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेला आहे तथापी संबंधितास नियोजन प्प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही.यामुळे साध्यस्थितीत रोहन खेडेकर व उमेश खेडेकर यांनी बिनशेती भुखंडामध्ये विना परवाना बांधकाम केलेले आहे असे स्पष्ट अहवाल जिल्हा प्रशासन अधिकारी सिंधुदूर्ग यांनी सादर केलेला आहे.

तक्रारदार योगेश प्रकाश चांदोस्कर यांनी दाखल केलेला अर्ज व मुख्याधिकारी न.पं.देवगड यांनी विवादीत बांधकामाबाबत दिलेला स्वयंस्पष्ट अहवाल तसेच रोहन खेडेकर यांनी तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने दाखल केलेले सविस्तर म्हणणे व त्यांच्या वकीलांनी तक्रारदार यांचा घेतलेला उलटतपास, प्रकरणात दाखल कागदपत्रे, कायद्यातील तरतुदी व कोर्टासमोर आलेल्या तोंडी व लेखी पुराव्यावरून जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग यांनी सदर प्रकरणी तक्रारदार यांनी केलेल्या अर्ज व त्याअनुषंगाने मुख्याधिकारी न.पं.देवगड जामसंडे यांनी दिलेल्या स्वयंस्पष्ट अहवाल तसेच वाद मिळकतीचे छायाचित्र, पंचनामा, स्थळ पाहणी अहवाल, जीपीएस् नकाशा प्रणालीमध्ये वस्तुस्थ{तीचे छायाचित्र, देवगड जामसंडे न.पं.सर्वसाधारण पावती नंगर ३१ व ३२, ऑनलाईन पध्दतीने केलेली बांधकाम परवानगी पावती, रोहन खेडेकर यांनी हजर केलेला तोंडी वाटपाचा स्मरण लेख, तक्रारदार यांचा घेण्यात आलेला तोंडी पुरावा, वेळोवेळी उच्च न्यायालयाने निर्गमित केलेले न्यायनिवाडे व देवगड जामसंडे न.पं.अभियंता विशाल होडावडेकर व बीट निरीक्षक भास्कर राऊळ यांनी केलेला पंचनामा त्याअनुषंगाने मुख्याध{कारी यांनी द{लेल्या स्वयंस्पष्ट अहवालाप्रमाणे रोहन खेडेकर यांनी आपले बंधू उमेश खेडेकर यांसोबत आपल्या नगरसेवक पदाचा गैरवापर करून अतिक्रमण केल्याचे सिध्द होते.एवढेच नव्हे तर विरवादित मिळकतीचे जीपीएस् नकाशा प्रणालीद्वारे घेतलेल्या छायाचित्रावरून सदर मिळकतीमध्ये बांधकाम अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होणारे आहे.सामनेवाला यांनी रीतसर बांधकाम परवानगी घेतलेली नाही.तसेच बांधकाम परवानगी शुल्क देखील वेळेत भरलेले नाही त्यामुळे विना परवाना सुरू केलेले बांधकाम हे अवैध ठरणारे आहे.सामनेवाला यांचेमार्फत घेण्यात आलेल्या उलटतपासामध्ये देखील तक्रारदार यांनी विवादीत मिळकतीचा सातबारा क्र १ त्यांचे बंधू उमेश खेडेकर यांच्या संयुक्त नावाने आहे असे कथन केलेले आहे याचा अर्थ रोहन खेडेकर व उमेश खेडेकर यांनी संयुक्तपणे सदरचे बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे हे सिध्द होणारे आहे.

रोहन खेडेकर हे लोकशाही पध्दतीने निवडून आलेले नगरसेवक असल्याने त्यांची वर्तणूक किंवा त्यांनी केलेली कृती ही समाजावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रभाव करणारी आहे.रोहन खेडेकर नगरसेवक पदावर असताना विना परवाना बांधकाम करत असले तर सर्वसामान्य जनता यातून चुकीचा बोध घेणार आहे असे झाल्यास समाजामध्ये बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन केल्यासारखे होईल असे मत जिल्हाधिकारी सिंधूदूर्ग यांनी आपल्या आदेशात व्यक्त केले व महाराष्टड्ढ नगरपर{षदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४(१ई) अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करून दि . ११/४/२०२३ रोजी अंतीम आदेश पारीत केला.सदर आदेशानूसार अर्जदार योगेश प्रकाश चांदोस्कर यांचा अर्ज मंजूर करणेत येवून महाराष्टड्ढ नगरपर{षदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ चे पोटकलम (१)(ई) अन्वये रोहन खेडेकर नगरसेवक देवगड जामसंडे न.पं.प्रभाग क्रमांक ७ यांना सदर आदेशाच्या दिनांकापासून अनर्ह ठरविण्यात आले.हा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देवगड जामसंडे न.पं.प्रशासनाला प्राप्त झाला आहे अशी माहिती प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!