कृषी विद्यार्थ्यांकडून शाळेत वृक्षदिंडी, वृक्षारोपण व महाविस्तार जनजागृती

फोडाघाटच्या कृषी विद्यार्थ्यांचा समाजाशी नातं जपणारा उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न ब्राम्नेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत (कै.) राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीविद‌यार्थी यांनी मारुती विद्यामंदिर जानवली येथे कृषी-दिन व स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली.

ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमानिमित्त वृक्षदिंडी, वृक्षारोपण व कृषी विद्यार्थ्यांनकडून महाविस्तार अँप विषयी माहिती यांसारखे उपक्रम राबविण्यात आले व त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले

या कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतशील शेतकरी यांचे सत्कार करण्यात आले शाळेचे मुखाध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. अभिनव पी.सी, अथर्व भोवर, देवराज निंबाळकर, सिद्धेश पताडे, सार्थक डोणे, प्रथमेश परब, अतुल शी. ए, ओम भांगरे. या कृषी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्‌यार्थाना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संते व कार्यक्रम समन्वयक बगाडे, श्री. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले

error: Content is protected !!