खारेपाटण एस. टी. बसस्थानकाची स्वच्छता मूल्यांकन सामितीकडून पाहणी

खारेपाटण बसस्थानकाचा स्वच्छता आदर्श: समितीकडून समाधान व्यक्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान अंतर्गत एक वर्षभर राज्यभरातील एसटीच्या बसस्थानकावर हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. याचे औचित्य साधून आज सोमवार दि. २८ जुलै, २०२५ रोजी खारेपाटण एस. टी. बसस्थानकाला मूल्यांकन समितीने भेट देऊन संपूर्ण एस. टी. बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी कोल्हापूर विभागीय नियंत्रक श्री. कानतोडे, विभागीय कामगार अधिकारी श्री. भोसले, कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, आगार प्रमुख श्रीनिवास कदम, ए. डब्ल्यू. एस. श्री कमलाकर, खारेपारण एस. टी. डेपो वाहतुक नियंत्रक प्रमुख शिवाजी होळकर, सुशिल सावंत, रमेश जामसंडेकर, राजन ठाकुर देसाई, सौरभ धालवलकर, तुषार कोळसुळकर, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी समितीकडून स्वच्छता तपासणी करण्यात आली. बसस्थानक प्रवेशद्वारी विविध फुलझाडे, शोभेवंत फुल्यांच्या कुंड्या तसेच प्रवासी वर्गासाठी आरामदायी बसण्याची आसन व्यवस्था तसेच शुद्धीकरण स्वतंत्र पिण्याच्या पिण्याची सोय, स्वच्छ आणि सुंदरतेच्या बाबतीत खारेपाटण स्थानक नीटनेटके ठेवण्यात आले होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर एस. टी. बसस्थानक अंतर्गत मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या समितीचे खारेपाटण वाहतूक नियंत्रक प्रमुख शिवाजी होळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर समितीने खारेपाटण एस. टी. बसस्थानकाच्या स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!