करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; प्रशासनाच्या तत्परतेने सुरळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गगनबावडा हद्दीत दरड कोसल्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. जेसिबीच्या साहाय्याने दरड बाजूला हटवून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती. तर सोमवारी पूर्णपणे दरड हटवून वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली आहे.

वैभववाडी तालुक्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने रविवारी रात्री करुळ घाटात गगनबावड्यापासून सुमारे १ किमी अंतरावर दरड कोसळली होती. या दरडीत मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे घाटातील वाहतूक सुमारे अर्धा तास पूर्णपणे ठप्प झाली होती. याची माहिती मिळताच घाटातील ठेकेदार वेल्हाळ कंपनीने जेसिबीच्या साहाय्याने दरड हटवून घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्यात त्यांना यश आले. सोमवारी सकाळी रस्त्यावर पडलेला तो भला मोठा दगड मशीनच्या साहाय्याने फोडून तुकडे करून बाजूला करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यानंतर घाटातील वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!