आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा संतोष नाईक यांची फेरनिवड संघटनेच्या मुख्य कार्यालय पुणे येथे जाहीर करण्यात आली. संतोष नाईक यांनी गेली चार वर्षे संघटनेच्या माध्यमातून कोकण विभागात केलेल्या उत्तम कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा पाचव्यांदा कोकण विभागीय अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. ही निवड संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जाहीर केली आहे.
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यावर कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर) या तालुक्यातील उत्तम संघटना बांधणी केली आहे. पुन्हा कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची निवड झाल्याने संपूर्ण कोकण विभागात ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मानवाचे अधिकार मिळवून देण्यासाठी संघटकनात्मक कौशल्याच्या प्रयत्नाने संघटना यापुढे अधिक जोमाने कोकण विभागात सर्व पदाधिकारी व सदस्य यांना सोबत घेऊन चांगले कार्य करुन कोकण विभागात संघटनात्मक ताकद वाढवू असा विश्वास संतोष नाईक यांनी व्यक्त केला.
संघटनेच्या वतीने नियुक्त पत्र देतेवेळी पुणे येथील राष्ट्रीय कार्यालयात एम.डी. चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष कोठारी, उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, निरीक्षक घनःश्याम सांडीम, मुळशी तालुकाध्यक्ष विलास भानुसे, मुळशी तालुका पदाधिकारी तसेच नूतन सिंधुदुर्ग-रत्नागिरी समन्वयक प्रणव बांदिवडेकर उपस्थित होते. संघटनेच्या सर्व उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संतोष नाईक यांची सलग पाचव्या वेळी कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे संघटनेची राष्ट्रीय कार्यकारारणी, राज्य कार्यकारणी, सर्व जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी तसेच कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघटनेचे सर्वयांनी पदाधिकारी व सदस्य, कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेच जिल्हा वीज ग्राहक संघटना, जिल्हा व्यापारी संघटना, ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.












