सुवर्णपदक विजेत्या मनस्या फाले चा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णींकडून सत्कार

एक हजार सहाशे सोळा रुपयांचा धनादेश देत दिली कौतुकाची थाप

कणकवली (प्रतिनिधी) : अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या रेंज रायफल प्रकारातील स्पर्धेत फोंडाघाट येथील मनस्या दिलीप फाले (वय १६) हिने सुवर्ण पदक पटकावत कोकणचे नाव उज्वल केले आहे. तिचे कौतुक करत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णींकडून तिला एक हजार सहाशे सोळा रुपयांचा धनादेश देत सत्कार करण्यात आला.

मनस्या ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी असून, तिचे वडील भाजी विक्रेते तर आई गृहिणी आहेत. अशा पार्श्वभूमीवर तिने मिळवलेले हे यश अधिकच प्रेरणादायी ठरते. NCC (National Cadet Corps) मधून सौ. भोगले आणि श्री. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे पहिले प्रशिक्षण शालेय इमारतीच्या टेरेसवर सुरू झाले. पुढे आंबोली येथील सैनिक शाळेतही तिने खास प्रशिक्षण घेतले. या उल्लेखनीय यशानंतर मनस्याचा सत्कार शाळेत करण्यात आला. शिवसेना पक्षाच्यावतीने देखील तिचा सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी तिला सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि रुपये १६१६/- चा धनादेश देऊन गौरवले. बाजारपेठेत डाॅ. आपटे यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी संस्था चेअरमन श्री. राजू पटेल, बबन शेट पवार, आण्णा लिंग्रस, सचिन तायशेटे आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तिचे अभिनंदन केले.

या मिरवणुकीत व हवेलीनगरपर्यंत करण्यात आलेल्या स्वागतप्रसंगी सरपंच आग्रे, शिवसेना गटनेते संजय आग्रे, तसेच अनेक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “एवढ्या लहान वयात सुवर्ण पदक पटकावणे हे निश्चितच गौरवास्पद आहे. तिचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे,” असे गौरवोद्गार अजित नाडकर्णी यांनी काढले.

error: Content is protected !!