कणकवली फोटोग्राफर असोसिएशनचा कै. नितीन मुसळेच्या कुटुंबीयांना मदतीचा हात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठमध्ये राहणारे फोटोग्राफर नितीन मुसळे यांचे अलीकडेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. नितीन मुसळे यांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व फोटोग्राफर यांच्यावतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
नितीन मुसळे यांच्यावर फार मोठी कुटुंबियाची जबाबदारी होती. त्याच्या जाण्याने कुटुंब पुर्ण पोरके झाले.बाल वयापासूनच खडतर प्रवास करून शिक्षण घेत नितीन मुसळे यांनी फोटोग्राफी करत कणकवली बाजारपेठेत आपले नाव कमावले होते. आपल्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन कणकवली तालुक्यात प्रापंचिक गाडा निर्माण केला. फोटोग्राफी सोबत एक चहा नाष्टाचा एक स्टाॅल सुरू करून कुटुंबियांचा आधारप्रमुख बनले होते. मुलाचे शिक्षण सुरू असतानाच अचानक एक अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कुटुंब पोरके झाले याची दखल कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्व फोटोग्राफर यांच्यावतीने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. सर्वांनी उत्स्फूर्त प्रतीसाद देत पंचवीस हजार रुपये जमा करून कै.नितीन मुसळे यांच्या कुटुंब आणि मुलाच्या शिक्षणासाठी सदर रक्कम त्यांना देण्यात आली.

error: Content is protected !!