सर्पमित्र केदार हडकर यांनी दिले चार फुट लांब अजगराला दिले जीवदान

चिंदर तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गांवकर यांच्या काजू बागेत आढळला अजगर

प्रसंगावधान राखत अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष गांवकर यांच्या काजू बागेत अजगर आढळून आल्याची माहिती हडी येथील सर्पमित्र केदार हडकर यांना मिळताच त्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी केदार हडकर यांनी अत्यंत सावधगिरीने सुमारे साडेचार फूट लांबीच्या अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले. सर्पमित्र केदार हडकर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अजगराला जीवदान मिळाले.

या वेळी संतोष गांवकर, एकनाथ पवार, बाबू परब, गिरीश भावे, हर्षदा परब, नम्रता परब, गणेश आचरेकर, बाळा मुणगेकर आदी उपस्थित होते.

वन्यजीवांचे संरक्षण करताना साप दिसल्यास घाबरून न जाता त्याला इजा न करता सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी केदार हडकर यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!