वैभववाडी (प्रतिनिधी) : महसूल दिनानिमित्त तलाठी सजा आखवणेचे महसूल सेवक (कोतवाल) सुनील नारायण पडीलकर यांना सन २०२४-२५ या महसुली वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल प्रमाणपत्र देऊन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने एक ऑगस्ट महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यावेळी तलाठी सजा आखवणे या सजाचे महसूल सेवक (कोतवाल) पडिलकर यांना गौरविण्यात आले. पडीलकर गेली वीस वर्ष वसूल सहाय्यक अर्थात कोतवाल म्हणून आपली सेवा बजावत आहेत. महसूल दिनानिमित्त त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.












