खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननोत्ती अभियान अंतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP) व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कणकवली यांच्या माध्यमातून खारेपाटण पंचशील नगर येथील पंचशील स्वयंसहाय्यता महिला समूह बचत गटाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या फळ प्रक्रिया युनिट व्यवसायाचा शुभारंभ आज मंगळावर दि.३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं.४.०० वाजता उमेद अभियानाच्या कणकवली तालुका व्यवस्थापक दक्षता पांजरी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामपंचायत सदय किरण कर्ले व सौ मनाली होणाळे यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आला.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर उमेदचे तालुका (F I ) व्यवस्थापक चेतन ताम्हणकर,तालुका ब्लॉक अँकर मयूर धुमाळे,खारेपाटण प्रभाग समन्वयक अमोल गराडे,अहिल्याबाई प्रभाग संघ अध्यक्षा दिप्ती तळेकर,क्रांती ज्योती ग्रामसंघ अध्यक्षा जागृती पोटले,सचिव – वृषाली दर्पे,महिला बचत गटाच्या एडिटर सौ अंजली कुबल,सिनियर CRP सौ आस्था पाटणकर,ग्रामसखी युती पोमेडकर,सायली तूरळकर,उर्मिला सुतार,चिंचवली CRP – रोहिणी शिरसेकर, वायंगणी CRP श्रध्दा कदम
पंचशील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा पूजा कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रधानमंत्री सुष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना आणि सिंधुरत्न समृद्ध योजना ओरोस यांच्या माध्यमातून खारेपाटण पंचशील नगर येथील महिलांनी एकत्र येत बचत गटाच्या माध्यमातून फळप्रक्रिया उद्योग सुरू केला असून या व्यवसायाला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज स्वरूपात १,३७,९२२ /- रुपये एवढे अर्थसाह्य पुरविले आहे. या व्यवसायाच्या पंचशील स्वयंसहाय्यता महिला बचत गट माध्यमातून आवळा कँडी,आवळा सुपारी,आवळा सिरप,कडीपत्ता पावडर,शेवगा पावडर,बीट आणि बटाटे वेपर इत्यादी पदार्थ बनविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदचे खारेपाटण प्रभागात काम हे उल्लेखनीय असून पंचशील महिला स्वयंसाह्यात बचत समूह गटाने फळ प्रक्रिया सारखा व्यवसाय सुरू करून महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने बळ दिले आहे.याचा आम्हाला अभिमान आहे.तर उमेद अभियानाचे कोणतेही अधिकारी जिल्ह्यात आले की, प्रथम खारेपाटण मध्ये त्यांना न्यावे लागते.मात्र खारेपाटणला आता एक नव्हे तर दोन स्वयंसहाय्यात समूह गटाने व्यवसाय सुरू केले असल्याने उमेदचे अभियान खऱ्या अर्थाने यशस्वितेकडे वाटचाल करत असल्याचे भावपूर्ण उदगार उमेद अभियानाच्या कणकवली तालुका व्यवस्थापक दक्षता पांजरी यांनी पंचशील महिला सव्यंसहायता समूह गटाच्या फळं प्रक्रिया व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी महिलाना मार्गदर्शन करताना काढले.”
“तर खारेपाटण पंचशील नगर येथील महिलांनी पुढाकार घेऊन जो फळ प्रक्रियांचा उद्योग सुरू केला आहे तो निश्चित कौतुकास्पद असून त्याच्या धाडसाला मी सॅल्युट करते असे खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य सौ मनाली होणाळे यांनी यावेळी सांगितले.’
“तसेच आमच्या पंचशील नगर येथील महिलांनी एकत्र येत धाडस दाखवून सुरू केलेला नवीन व्यवसाय हा खारेपाटण च्या परिवर्तन उत्कर्षाला गती देणारा ठरणार असून यामुळे उमेदचे काम व नाव निश्चित मोठे होणार असल्याचेवल उदगार यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण बुद्धविहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात CRP – आस्था पाटणकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.व गेल्या ५ वर्षापासून असलेले आमचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले असल्याने आजचा दिवस आमच्या सर्व महिला भगिनीच्या आयुष्यातील सुवर्णक्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष पाटणकर यांनी मानले.







