सिंधुदुर्गात बनावट दारू वाहतुकीवर कारवाई; २.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुडाळ येथे बनावट दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत २ लाख ८२ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक ०२ ऑगस्ट, २०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुडाळ क्र. ०२ यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार दोन पंच आणि स्टाफसह असे सर्वजण मिळून पिंगुळी ता. कुडाळ येथे जावून खाजगी वाहनाने बातमीप्रमाणे वाहन अल्टो कार क्र. एम.एम/एच-२२०७ हे थांबवून तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण ३३ बॉक्स जप्त करण्यात आले. सदर मिळून आलेले ३३ बॉक्स व अल्टो कार क्र. एम.एम/एच-२२०७ असा एकूण रु २,८२,४००/- किंमतीचा मुद्येमाल दारूबंदी गुन्ह्यांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला.

सदर वाहनचालक बस्त्याव सायमन गोन्स्लावीस, वय २२ वर्षे, रा. मु.पो. होडावडा ख्रिश्चनवाडी, घर नं. ७७ ता. वेंगुर्ला याला या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मिलिंद गरूड आणि दुय्यम निरीक्षक उदय थोरात यांनी केली. त्यांना दुय्यम निरीक्षक अर्चना वंजारी, सहाय्यम दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, वैभव कोळेकर, प्रसाद खटाटे, साईनाथ मेहकर, संदीप कदम तसेच वाहनचालक, जवान व मदतनीस तसेच अवधूत सावंत, विजय राऊळ व प्रशांत परब यांची मदत लाभली.

पुढील तपास दुय्यम निरीक्षक उदय थोरात हे करत आहेत.

error: Content is protected !!