तिरवडे तर्फ खारेपाटण येथील कॉलेज युवकाची आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिरवडे तर्फ खारेपाटण येथील कॉलेज युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिवेश दीपक कांबळे वय वर्ष २० असे या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र त्याच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण समजू शकले नाही.तरुण मुलाच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याबाबत त्याचे वडील दीपक धोंडू कांबळे यांनी पोलिसात खबर दिली आहे.

मयत दिवेश कांबळे हा वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता. रविवारी रात्री जेवण्यासाठी त्याला घरातील शोधत होते. यावेळी घरातील एक खाली आतून बंद होती.या खोलीत खिडकीतून पाहिले असता, तो गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. दरवाजा फोडून त्याला खाली उतरले मात्र तो पर्यत तो मयत झालेला होता. याबाबत त्याचे वडील दीपक कांबळे यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत खबर दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ, आजोबा असा परिवार आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर बी पाटील करीत आहेत.

error: Content is protected !!