आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, भाऊ हडकर यांची प्रमुख उपस्थिती
आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जि. प. शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये होणार वितरण
आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना शिंदे गटाकडून आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळांमध्ये वह्या वितरण करण्यात येत असून याचा शुभारंभ आज चिंदर भटवाडी जिल्हा परिषद शाळा, सडेवाडी जिल्हा परिषद शाळा मधून विद्यार्थ्यांना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, भाऊ हडकर यांच्या हस्ते वितरण करून करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, राजु वराडकर, मैना कारंडे, दिपा गोसावी, विजय पाटील, शैलेश गोलतकर आदी उपस्थित होते. भटवाडी शाळा मुख्याध्यापक सौ. निशिगंधा वझे, सडेवाडी शाळेच्या शिक्षिका शुभांगी खोत-लोकरे यांनी मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानले.












