वनपालाविरुद्ध तक्रारीला तीन वर्षे उलटली, तरीही कारवाई नाही; जयंत बरेगार यांचे पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू

सहा चौकशी अहवालांनंतरही पोलिस प्रशासन शांत; अन्यायाविरोधात जयंत बरेगारांचा निर्णायक लढा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तत्कालीन वनपाल (माणगाव) यांच्या विरोधात ७ एप्रिल २०२१ रोजी कुडाळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली असताना तब्बल १३ महिन्यांनी १३ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी आतापर्यंत सहा पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून चौकशी अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी जयंत बरेगार यांनी आजपासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

माणगांव येथील तत्कालीन वनपाल यांच्या विरोधात जयंत बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर तब्बल १३ महिन्याने, १३ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला . त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक याचे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले असता त्यांच्या वतीने तीन उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कुडाळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत चौकशी झालेली आहे मात्र अद्याप कारवाई झालेली नाही तीन वेळा उपोषणे करूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली नाही यामुळे या प्रकरणाचा अर्ज आपल्या कार्यालयाकडे २१ ऑक्टोबर २०२१ पासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. असे जयंत बरेगार यांनी पोलिस अधीक्षक याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .तरी याबाबत न्याय मिळावा व संबंधित दोषींवर कारवाई व्हावी. अशी मागणी करण्यासाठी जयंत बरेगार यांनी आजपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे आणि जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असा निर्धार केला आहे. तसेच तक्रार देऊन ३ वर्षाचा कालावधी निघुन गेला तरी अद्याप कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कारभाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!