देवगड जामसंडे शहरात कचरा संकलन ठप्प
देवगड (प्रतिनिधी): देवगड जामसंडे नगरपंचायत मधील ३० सफाई कामगारांनी नगरपंचायत कार्यालयासमोर अचानक काम बंद आंदोलन केल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील कचरा संकलन करण्याचे काम पूर्णतःठप्प झाले आहे. मक्तेदाराने अचानक पगारात सुमारे १५००/-(दीड हजार) रुपये कपात केल्याने हे काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी बोलताना दिली. देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत मक्तेदाराला सफाई कामगारांच्या पगाराची रक्कम दिली जाते ती त्याप्रमाणे प्रशासना मार्फत मक्तेदाराला दिली गेली मक्तेदारामार्फत या कामगारांचे पगाराची रक्कम मागील महिन्याच्या पगारापेक्षा सुमारे १५००/-रु ची कपात केल्याने हा सफाई कामगारांवर अन्याय असून पगाराची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय सफाई कामगार काम करणार नाहीत .प्रसंगी संबंधित मकेदाराने समक्ष येऊन कामगार वर्गाची चर्चा करावी. अशी ही मागणी कामगार वर्गातून करण्यात आली नगरपंचायतीचे प्रशासना मार्फत चर्चा करून आपल्याला योग्य तो न्याय दिला जाईल व आपली कपास केलेली रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करू अशी चर्चा करूनही सफाई कामगार आपल्या काम बंद आंदोलनावर ठाम राहिले आहे .












