राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फोंडाघाट (प्रतिनिधी): ब्राह्मणेश्वर सामाजिक शैक्षणिक उन्नती मंडळ संचलित कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय, फोंडाघाट येथे दि. १४/०४/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पंकज संते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले व डॉ. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तर प्रा. आशुतोष वारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, इतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!