चौके (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील काळसे ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काळसे सरपंच विशाखा काळसेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी सरपंच विशाखा काळसेकर , ग्रामसेवक पी. आर. निकम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
काळसे ग्रामपंचायत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी












