सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांचे विशेष प्रयत्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालूक्यातील पडेल या गावातील वारीकवाडी येथील रहिवासी सुभाष शंकर चव्हाण वय ६० वर्षे हे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण मागील २० वर्षापासून मानेवर वाढलेल्या चरबीच्या गाठीने भयंकर व दुर्मिळ अशा आजाराने त्रस्त होते. ही माहिती भाजप कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांना समजताच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सुभाष चव्हाण यांचेवर मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरकरवी मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले.
याबाबत अधिक वृत्त असे की, पडेल वारीकवाडी येथील मूळ रहिवासी असलेले सुभाष चव्हाण हे मानेवर वाढलेल्या अतिरिक्त चरबीयुक्त गाठीने गेली २० वर्षे त्रस्त होते. मात्र घरची परिस्थीत खूपच हालाकीची असल्याने त्यांच्यावर उपचार होत नव्हते. मात्र ही बाब भाजप पक्षाचे उ. प. मुंबई जिल्हा सचिव नामदेव चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे व माननीय आमदार नितेश राणे यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णाची भेट घेऊन मुंबई येथील नामांकित अशा जसलोक रुग्णालयात सुमारे ६ तासांची नाजुक किचकट अशी पूर्णतः मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले. या शास्त्रक्रिये करिता एकूण ४ लाख रुपये एवढा खर्च आला असून रुग्ण सुभाष चव्हाण हे या आजारातून पूर्ण बरे झाले असून त्यांची तब्बेत आता ठणठणीत झाली आहे.
पडेल येथील रुग्ण सुभाष शंकर चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांनी तातडीने मदत केल्याबद्दल यांचे आभार व्यक्त केले असून मुंबई येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे.













