कणकवली (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्या वतीने स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आज विभाग नियंत्रक एसटी स्टँड कणकवली यांच्या कडे स्टँड परिसरातील रेस्टरारंटच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपायोजना व परिसरातील स्वच्छता राखणे कुंड्या मधील रोपांची निगा राखणे, तसेच कुठे ही न थुंकणे या बाबतीत लक्ष्य वेधण्यासाठी स्टँड परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. तसेच वेळोवळी अनाउन्समेंट करून प्रवासी यांच्या मध्ये जनजागृती करण्यात यावी, असे सुचविण्यात आले.
तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्या वतीने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कणकवली डॉक्टर रेड्डी यांच्या कडेही रूग्णालय परिसर रूग्णालयातील स्वच्छता राखणे याविषयी मागणी करण्यात आली. त्यांनी सांगितले कि फक्त दहा दिवसांनी तुम्हांला येथील परिसरात स्वच्छता राखणे याविषयी सुधारणा झालेली दिसेल, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा कणकवलीच्या अध्यक्षा श्रद्धा कदम, उपाध्यक्षा गितांजली कामत, सल्लागार मा. अशोक करंबेळकर व मा. मनोहर पालयेकर, सहसंघटक राजन भोसले, सदस्य महानंद चव्हाण, विश्वासराव सावंत, कृष्णा दळवी, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मराठे, संस्थेचे सदस्य व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालेकर, सचिव विलास चव्हाण उपस्थित होते.












