प्रा. रामचंद्र भरांडे यांना “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार”
अनिल जाधव, डी. के. पडेलकर, कृष्णा पाताडे, पी. जे. कांबळे, मिलिंद जाधव यांना “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार”
कणकवली (प्रतिनिधी) : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य आणि लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त 17 ऑगस्ट 2025 रोजी व्याख्यान व पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात “अण्णा भाऊ साठे यांचा जीवनवाद” या विषयावर विशेष व्याख्यान होणार असून, लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्रा. रामचंद्र भरांडे (नांदेड) यांना “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. तसेच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डी. के. पडेलकर (पडेल), समाजसेवक कृष्णा पाताडे (सुकळवाड), विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, अपरांत साहित्य व कला अकादमीचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. अनिल जाधव आणि फोंडाघाटचे कार्यकर्ते मिलिंद जाधव यांना “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार” देण्यात येणार आहे.
समारंभाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे महासचिव प्रा. डॉ. राज ताडेराव असतील.
अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य, शाहिरी आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून वंचित समाजाचे वास्तव मांडत प्रबोधनाचा दीप प्रज्वलित केला. जीवनवादी लेखक म्हणून त्यांचा उल्लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच त्यांच्या जीवनवादावर केंद्रित व्याख्यान आयोजित होत आहे.
अण्णा भाऊ प्रेमी, वाचक व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सोमनाथ कदम, जिल्हाध्यक्ष सुधाकर भिंगारदिवे आणि साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे राज्य संघटक डॉ. देविदास हारगिले यांनी केले आहे.











