प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते अजित नाडकर्णी यांचा सन्मान

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्राम महसूल अधिकारी फोंडाघाट तसेच मंडळ अधिकारी कार्यालय फोंडाघाट या इमारतीच्या छतावर अजित नाडकर्णी सामाजिक कार्यकर्ते फोंडाघाट यांनी स्वखर्चाने लोखंडी पत्रे बसवून दिले त्याबद्दल मा. उपविभागीय अधिकारी कणकवली जगदीश कातकर यांच्या शुभहस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी अजित नाडकर्णी यांनी तलाठी ऑफीस हे फोंडाघाट मध्ये आणखी अद्यावत करण्यासाठी त्याच प्रमाणे लाईट गेल्यावर सर्व काॅंप्युटर यंत्रणा थांबते, त्यासाठी इन्व्हर्टरही लोकसहभागातुन लवकरचं देण्यात येईल. आज याठिकाणीचे ग्रामपंचायत ध्वजवंदन करुन प्रांत कातकर, तहसीलदार श्री. देशपांडे यांच्या खास निमंत्रणामुळे जाणं भाग पडलं, असे अजीत नाडकर्णी यांनी विषद केले. मंत्री नितेशजी राणे यांच्या प्रेरणेतुन सर्व काम करण्याची उर्जा मिळते, असे अजित नाडकर्णी म्हणाले. पुनच्या सर्वांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा!

error: Content is protected !!