खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय पडवे,ता. राजापूर,जि.रत्नागिरी या शाळेची विद्यार्थीनी तसेच मुळगाव – महाळुंगे (बौद्धवाडी) ता. राजापूर या गावाची रहिवासी असलेली कुमारी सलोनी संजय पवार हिने नुकतीच गोवा महाराष्ट्र आणि गुजरात अशा तीन राज्यांची मिळून घेण्यात आलेल्या जे एन यू च्या तायक्वांदो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून नुकतीच तिची राष्ट्रीय पातळी वरील तायक्वांदो स्पर्धेत खेळण्यासाठी निवड झाली आहे.
कु. सलोनी पवार हिच्या या अभिनंदनीय निवडी बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.तर राष्ट्रीय पातळीवर होणारी पुढील तायक्वांदो स्पर्धा ही जम्मू काश्मीर या ठिकाणी दि .२५ ऑगस्ट २०२५ पासून होणार असून यासाठी तिला तिचे वडील प्राथमिक शिक्षक संजय पवार आणि नवोदय विद्यालय पडवे या शाळेच्या मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी राष्ट्रीय पातळीवरील पुढील स्पर्धेत खेळण्यासाठी शुभेछा दिल्या आहेत.
कु.सलोनी संजय पवार ही आंबेवाडी आणि राजापूर हायस्कूल या शाळेची माजी विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच तिने विविध खेळात अनेक पदकेआणि प्रमाणपत्र मिळविलेली आहेत. तर
तालुका आणि जिल्हा पातळीवर देखील तिने अनेक स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला आहे. कु. सलोनी पवार हिला राष्ट्रीय पातळीवर तायक्वांदो स्पर्धेत सुयश प्राप्त होवो अशी आशा सर्वांकडून व्यक्त करण्यात येत आहे.












