वराडकर हायस्कूल कट्टाची इयत्ता आठवीची विद्यार्थ्यांनी
चौके (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता आठवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हुबेहूब व अप्रतिम रांगोळी रेखाटून जयंती निमित्त आंबेडकरांना अनोख्या पध्दतीने अभिवादन केले आहे. श्रेयाच्या या कलाकृतीबद्दल तिचे पालक , शिक्षक , मुख्याध्यापक आणि संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.












