खारेपाटण (प्रतिनिधी): घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती खारेपाटण पंचशील नगर येथे पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर,माजी सरपंच रमाकांत राऊत,सामजिक कार्यकर्ते विजय देसाई, मंगेश गुरव,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष मोहन पगारे,खारेपाटण ग्रा.प.सदस्य किरण कर्ले, अमिषा गुरव, शितिजा धुमाळे,अस्ताली पवार, दक्षता सुतार, मनाली होनाळे, जि.प.केंद्र शाळा खारेपाटण चे मुख्यधापक प्रदीप श्रावणकर,शाळेचे शिक्षक संजय राऊळ सर, रवींद्र नाडगौडा,अर्चना ताळगावकर, अलका मोरे संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा आंकंशा पाटणकर नडगिवे गावचे माजी सरपंच मांजरेकर, संतोष रोडी, ग्रा.पं.सदस्या युती पोमेडकर खारेपाटण हायस्कूलच्या शिक्षिका स्वप्नाली कांबळे मॅडम,मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, अशोक पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला अध्यक्ष संतोष पाटणकर व महिला मंडळाच्या अध्यक्षा आकांशा पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने भरविण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन विजय देसाई यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आले. यानंतर खारेपाटण बुद्धविहार येथे बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक धम्म पूजा पाठ घेण्यात आला.यामध्ये सर्व धम्म बंधू भगिनी सहभाग घेतला.

डॉ.बाबसाहेब आबेडकर जयंती निमित्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धा, निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व पाक कला स्पर्धा तसेच विविध फनिगेम स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,रोख रकमेचे पारितोषिक. व पुषपगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच मंडळाचे कार्यकर्ते जितेंद्र कदम व नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्या अस्ताली पवार यांचा विशेष सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाचे नेते असून त्यांची जयंती सर्वत्र साजरी व्हायला पाहिजे.व बाबासाहेबांचे विचार हे घराघरात पोहचले पाहिजेत.असे भावपूर्ण उदगार खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांनी जयंती कार्यक्रमात उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना काढले.” तर सामजिक कार्यकर्ते मंगेश गुरव यांनी “पंचशील विकास मंडळ खारेपाटण हे नेहमीच खारेपाटण मध्ये चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करत असून सामजिक, क्रीडा,सांस्कृतिक याबरोबरच महत्वाचा असा शैशणीक उपक्रम राबवून आबेडकरी चळवळीचे समाजाला अपेक्षित असलेले कार्य खऱ्या अर्थाने जोमाने पुढे नेत असल्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते संतोष जुवाटकर,संदीप पाटणकर, धीरज जुमलेकर,भरत पाटणकर, प्रथमेश कदम,मकरंद पाटणकर, भूषण गोवळकर,विराज पाटणकर, सागर पोमेडकर,ललित पाटणकर, कुणाल पाटणकर,आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.













