कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडियन पोलीस मित्र भारत, डॉ सुशील अग्रवाल हेल्प फौंडेशन ओम त्रिदेव योग आध्यात्मिक ट्रस्ट यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा व प्रतिष्ठित चा समजला जाणारा 2025 चा राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार कौलव ता राधानगरी येथील सुजाता संदीप कलिकते यांना प्रदान करण्यात आला शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सुजाता कलिकते या चैतन्य संस्था राजगुरू नगर खेड पुणे प्रेरित यशस्वी ग्रामीण महिला संघ करवीर येथे व्यवस्थापिका पदावर म्हणून काम करत आहेत संघाच्या करवीर, राधानगरी तालुक्यातील 28 गावातील कार्यक्षेत्रात महिलांच्यासाठी सक्षमीकरणाची चळवळ जोमाने चालू ठेवलेली आहे या संघाच्या मार्फत महिलांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य दिले आहे महिलांना आजपर्यंत उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन व्यवसायासाठी बाजारपेठ निर्माण करून दिली आहे वृक्षारोपण ,शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप स्त्रीभ्रूणहत्या जागरण, एड्स जागरण, महिलांच्या करीता आरोग्य शिबिर आदी कार्यक्रम राबविले आहेत या कामी त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे त्यासाठी त्यांना चैतनसंस्थेच्या ट्रस्टी सुधा ताई कोठारे, कल्पनाताई पंत, सुरेखाताई क्षोत्रिय, रेश्मा ताई, नूतन कांबळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांना मनीषा शिंगाडे, शितल कुसाळे, वैशाली कांबळे यांचे सहकार्य लाभले आहे आतापर्यंत त्यांना महिला क्षमीकरणाच्या कार्याकरीता युवा ग्रामीण पत्र संघ कोल्हापूर, युनियन तरुण मंडळ कौलव, श्री जोतीर्लींग फौंडेशनआवळी बु, चैतन्य संस्थेच्या वतीने उत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कार,कै दादासाहेब कृ पाटील (कौलवकर) ट्रस्ट यांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ सुरेश राठोड फाउंडेशन कोल्हापूर, इंडियन पोलीस मित्र भारत, डॉ सुशील अग्रवाल हेल्प फौंडेशन ओम यांच्यावतीने पुरस्काराने सन्मानित केले आहे या कार्यक्रमाप्रसंगी कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव, पळसंबे गगनगिरी मठाधिपती बाळकृष्ण महाराज, प्रसिद्ध अभिनेते संजय मोहिते, दैनिक रोखठोकचे संपादक सुरेश माडकर ,फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश राठोड, अॕड डॉ सुशील अग्रवाल विठ्ठल मुर्केवार, योग सद्गुरू डॉ कृष्णदेव गिरी महाराज, डॉ गुंडोपंत सुतार आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला
सुजाता कलिकते यांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार प्रदान












