देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी पडेल भाजपा मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांच्या फणसगाव – विट्ठलादेवी येथील घरी जात गणेशदर्शन घेतले. मागील 14 वर्षे सातत्याने नितेश राणे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतात. ही परंपरा राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग चे पालकमंत्री झाल्यानंतरही अत्यंत व्यस्त शेड्युल मध्येही मंत्री राणे यांनी जपली आहे. यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा खडपे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, डॉ अमोल तेली, रवी पाळेकर, रवी तिर्लोटकर, अंकुश ठुकरुल, विश्वनाथ पडेलकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणेंनी घेतले बंड्या नारकर यांच्या घरी गणेशदर्शन












