मनमिळाऊ स्वभावाच्या स्नेहल राणे यांचे आकस्मिक निधन; शिक्षक व नागरिकांत शोककळा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओझरम येथिल आदर्श प्राथमिक शिक्षिका स्नेहल संतोष राणे याचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मंगळवारी रात्री मुंबई येथे खाजगी बसने जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागूने लांजा येथिल शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना निधन झाले. त्याची देवगड तालुक्यातील गोवळ गावठण शाळेत मुख्याध्यापिका म्हणून त्याची नुकतीच नेमणूक झाली होती. मनमिळाऊ, हसतमुख स्वभावाच्या व नेहमीच सामाजिक बांधिलकीतून काम करणा-या शिक्षिकेचा अकाली जाण्याने ओझरम, कासार्डे, तळेरेसह कणकवली व देवगड तालुक्यातील शिक्षक व नागरीकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पती, सासू, दोन मुली, भावजय,पुतण्या,बहिणी,भाऊ, भावोजी, काका, काकी असा परिवार असून सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्या. सिंधुदुर्गनगरीचे माजी उपाध्यक्ष,विद्यमान संचालक व देवगड जि.प.पेंढरी शाळेतील शिक्षक संतोष राणे याची ती पत्नी होती.












