खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या सणा निमित्त कोकणात आलेले गणेश भक्त मुंबईकर चाकरमानी आता आपल्या कुटुंबासह परतीच्या प्रवासाला जायला निघाले असून आज खारेपाटण येथे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर एस टी बस सह खाजगी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या.
गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आता बरचसे मुंबईकर गणेशभक्त चाकरमानी आता मिळेल त्या वाहनाने मुंबईला जावू लागले असून खारेपाटण एस टी बस स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी दिसून येत होती.तर खाजगी ट्रॅव्हल्स च्या गाड्या देखील कित्येक पटीने जास्त जात असल्याच्या दिसून येत होत्या.साधारण प्रति व्यक्ती १३०० ते १५०० रुपये तिकीट भाडे देऊन प्रवासी मुंबईला जात असल्याचे समजते.दरम्यान खारेपाटण मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशाच्या गर्दीमुळे परिसर गजबजून निघाला होता.












