तरुणांसाठी सुवर्णसंधी! सिंधुदुर्ग बँकेत लिपिक पदासाठी मोठी भरती

३० सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज ; आयबीपीएस मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार भरती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त असलेल्या ७३ लिपिक पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस या संस्थेमार्फत राबविली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या www.sindhudurgdcc.com या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

बँकेकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ०५ सप्टेंबर, २०२५ पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर, २०२५ ही आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीखही ३० सप्टेंबर २०२५ असून ऑनलाईन परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख बँकेच्या संकेतस्थळावर नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा निकालानंतर कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. उपरोक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, परिविक्षाधिन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इत्यादी बाबतची विस्तृत माहिती बँकेच्या www.sindhudurgdcc.com या संकेतस्थळावर दि.०५ सप्टेंबर, २०२५ ते दि.३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पहावयास उपलब्ध आहे. उमेदवार सिंधुदुर्ग जिल्हयातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना वय अधिवास दाखला (Domicile Certificate) अपलोड करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन परिक्षा शुल्क संकेतस्थळावर भरणा केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंट मोडव्दारे भरावयाची आहे. अर्जासोबत भरलेले परिक्षा शुल्क ना परतावा (Non Refundable) राहील. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्रता, स्वतःचा ई-मेल आय.डी., मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे. एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरूस्ती करता येणार नाही. उमेदवारास ऑनलाईन लिंकवर अर्ज भरण्या अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी आयबीपीएस संस्थेच्या CGRS या पोर्टलवर https://cgrs.ibps.in/ नोंदवायची आहे. प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहिल.

संपूर्ण भरती प्रक्रिया केवळ ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार असून, या भरतीचा फायदा जिल्ह्यातील तरुण वर्गाने घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेच्या व्यवस्थापनामार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!