श्रीगणेशा आरोग्याचा अभियान अंतर्गत आयोजन
चौके (प्रतिनिधी) : श्रीगणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सिंधुदुर्ग व सार्वजनिक गणेशोत्सव यांच्या समन्वयाने आरोग्य उपकेंद्र धामापूर यांच्या वतीने ग्रामपंचायत धामापूर येथे नुकतेच आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबीराचा शुभारंभ धामापूर सरपंच मानसी महेश परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश परब, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, माजी सरपंच धामापुरकर, दत्तात्रय विठ्ठल देसाई, ग्रामपंचायत अधिकारी पूजा वानोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आरोग्य सहाय्यक एस. बी. डांगमोडेकर, एस. एस. चव्हाण, समुदाय आरोग्य अधिकारी दिव्या शेवडे, आरोग्य सेवक एस. डी. वेंगुर्लेकर, आरोग्य कर्मचारी पूनम माने, माया इन्सूलकर, ममता गावडे आदि जण उपस्थित होते.
या आरोग्य शिबीरामध्ये ई.सी.जी., सर्व प्रकारची रक्त तपासणी, टेलीमेडिसिन, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड काढणे इत्यादी चा एकूण 52 लाभार्थी ग्रामस्थानी लाभ घेतला. याव्यतिरिक्त 28 रुग्णाना किरकोळ उपचार देण्यात आले. तसेच सर्व आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी माहिती उपस्थिताना देण्यात आली.












