रंगुनी रंगात, रंग माझा वेगळा— फोंडाघाट, आर.के .ग्रुप तर्फे अभिनव भजन स्पर्धेचे आयोजन !

श्री देव राधाकृष्ण मंदिर, अखंड हरिनाम सप्ताह महोत्सवाचे निमित्ताने सलग ११ व्या वर्षी तारीख ११ ते १३ सप्टेंबर रोजी स्पर्धेचे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री देव राधाकृष्ण मंदिराचे सलग ११९ व्या वर्षी च्या अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ गुरुवार तारीख ११ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे.या निमित्ताने आर. के. ग्रुप फोंडाघाट तर्फे सलग अकराव्या वर्षी तारीख ११/१२/१३ सप्टेंबर रोजी रात्रो आठ वाजता मंदिरामध्ये, संगीत भजन स्पर्धा २५ चे आयोजन करण्यात आले आहे. आजवर या ग्रुपच्या माध्यमातून भजन प्रेमींनी लोकप्रिय आणि श्रेष्ठ भजन मंडळाच्या भजनांचा आस्वाद घेतला आहे.त्यामुळे या ग्रुपने स्पर्धांमध्ये जिल्ह्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे …

या तीन दिवशी भजन रसिकांनी भजनांचा लाभ घ्यावा.तसेच सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी श्रीकांत पारकर (९४०३५५८१७) फोंडाघाट यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन आर. के. ग्रुप कडून करण्यात आले आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सप्ताह महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, १७ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता करण्यात येणार आहे याचीही नोंद घ्यावी…

error: Content is protected !!