ग्रामीण भागात शेती, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरणास चालना
आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील लौकिक सांस्कृतिक भवनात ‘एच डी एफ सी परिवर्तन’ या सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पाचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. समारंभाचे उद्घाटन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश नारायण राणे आणि शिवसेना पक्ष जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा प्रकल्प ‘वनराई’ संस्थेच्या पुढाकाराने आणि ‘एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने राबविला जात आहे. या प्रकल्पाचा उद्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि देवगड तालुक्यातील निवडक २५ गावांमध्ये सर्वांगीण ग्रामीण विकास साधणे हा आहे. याप्रसंगी आचरा येथील शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.
या समारंभासाठी प्रमुख पाहुण्यांमध्ये रूपक महापात्रा (झोनल हेड, एचडीएफसी बैंक – पश्चिम महाराष्ट्र), केदार कुलकर्णी (क्लस्टर हेड, एचडीएफसी बँक – सिंधुदुर्ग), सागर धारिया (विश्वस्त, वनराई), विनीत जाधव (सीएसआर मॅनेजर, एचडीएफसी बँक), संतोष देसाई (शाखा व्यवस्थापक, एचडीएफसी बँक देवगड), धनश्री बांदेकर (शाखा प्रमुख, एचडीएफसी बैंक मालवण), अमोल करंदीकर (तालुका कृषी अधिकारी, मालवण), हुसेन आंबर्डेकर (मंडळ कृषी अधिकारी, मालवण) आणि अभिजित मदने (कृर्षी विस्तार अधिकारी), शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, उपजिल्हा प्रमुख महेश राणे, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, प्रकाश तोंडवळकर, संतोष मिराशी, चावल मुजावर, अर्जुन बापार्डेकर, बाबू परुळेकर, पंकज आचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, अभिजित सावंत, अभय भोसले, सचिन हडकर, मनोज हडकर, रावजी सावंत, उपस्थित होते. तसेच देवगड, कुणकेश्वर, मिठमुंबरी आणि मुणगे गावच्या सरपंच आदी उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत गावांमध्ये शेती विकासासाठी फळबाग लागवड, जलसंधारण आणि सुधारित तंत्रज्ञान प्रशिक्षण, शिक्षणासाठी स्मार्ट क्लासरूम व करिअर मार्गदर्शन, ग्रामीण भागातील महिला व मच्छीमारांसाठी आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरणासाठी उद्योग व उपजीविका प्रशिक्षण, तसेच नैसर्गिक संसाधन संवर्धनासाठी बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि भूजल संवर्धनाचे उपक्रम राबविले जातील.
प्रमुख पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “ग्रामीण समाजजीवन समृद्ध करण्यासाठी हा प्रकल्प निश्चितच मोलाचा ठरेल.”
‘वनराई’चे प्रकल्प समन्वयक संकेत कुवेसकर आणि गौरी मायनांक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर ‘वनराई’चे प्रादेशिक प्रकल्प व्यवस्थापक ऋषिकेश दुदम यांनी उपस्थितांचे आभार मानले












