वाढदिवस रवींद्र चव्हाणांचा ….सेवाभावी उपक्रम नितेश राणेंचा

प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवशी पालकमंत्र्यांकडून सामाजिक उपक्रम

नाग्या म्हादू कातकरी विद्यार्थी वसतिगृहाला सोलर पॅनेल सिस्टीम, दिविजा वृद्धाश्रमाला वॉशिंग मशीन प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस भाजपा नेते, सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी सेवाभावी उपक्रमांनी साजरा केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दिविजा वृद्धाश्रम असलदे ला वॉशिंग मशीन तसेच नाग्या म्हादू कातकरी विद्यार्थी वसतिगृह वेताळबांबर्डे या इमारतीला सोलर पॅनल सिस्टीम प्रदान केली. कणकवली येथील खासदार नारायण राणे संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, पं. स सभापती हर्षदा वाळके, जि. प सदस्य मनोज रावराणे, जि. प सदस्य सुप्रिया मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, पं. स सदस्य अण्णा खाडये, नगरसेवक बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेविका आर्या राणे, नगरसेविका मनस्वी ठाणेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, हरकुळ सरपंच बंडू ठाकूर, पप्पू पुजारे, सागर राणे,सदा चव्हाण, राजू हिर्लेकर,अमोल रासम, सुभाष मालंडकर, औदुंबर राणे, मिथुन ठाणेकर,महेश सावंत,नयन दळवी, विजय चिंदरकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त देशभर भाजपच्या वतीने सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे.तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवस आज सेवाभावी उपक्रमातून साजरा केला जात आहे. नाग्या म्हादू कातकरी विद्यार्थी वसतिगृहाचे लाईट बिल सरासरी 14 हजार दरमहा येत आहे. सोलर पॅनल सिस्टीम मुळे हे लाईट बिल शून्य होऊन त्यांच्या संस्थेवरील आर्थिक भार कमी होईल.सोलर पॅनल मुळे सौरवीजनिर्मितीला चालना मिळेल. दिविजा वृद्धाश्रमातही असलेल्या आजीआजोबांना दैनंदिन गरजेची वस्तू म्हणून वॉशिंग मशीन अत्यावश्यक होती. दिविजा फाऊंडेशन संस्था सचिव संदेश शेट्ये यांच्या मागणीनुसार अद्ययावत साडेआठ किलोची वॉशिंग मशीन दिली आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या दातृत्वाबद्दल दिविजा वृद्धाश्रमाचे सचिव संदेश शेट्ये, नाग्या म्हादू वसतिगृह संस्थेचे उदय आईर यांनी मंत्री नितेश राणेंचे आभार मानले.

error: Content is protected !!