विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : विषारी औषध प्राशन केलेल्या कोकिसरे ओझरवाडी येथील तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय ओरोस येथे शुक्रवारी रात्री निधन झाले. निलेश प्रभाकर आंबेरकर वय 31 असे या मयत तरुणाचे नाव नाव आहे. मयताचा मामे भाऊ गणेश मांजरेकर राहणार कोकिसरे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे.

मयत निलेश आंबेरकर याने दहा दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. त्याच्यावर ओरोस येथे तसेच तिथून कणकवली येथील खाजगी रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.  त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले भाऊ बहिणी असा परिवार आहे

error: Content is protected !!