मुंबई (प्रतिनिधी) : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण याना भैरीभवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचा अतुल रावराणे नेहमीच आपले मोठे बंधू म्हणून उल्लेख करतात. राजकारणातील गुरू आणि जेष्ठ मार्गदर्शक बंधू म्हणून नेहमीच अतुल रावराणे यांच्या हृदयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे अढळ स्थान आहे. पक्षीय व्यासपिठापेक्षा मैत्रीचे नाते अतुल आणि रविंद्रदादा यांच्यामध्ये अतूट आहे. आज मध्यरात्री मुंबईत रविंद्र चव्हाण यांनी वाढदिवशी शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यावेळी अतुल रावराणे यांनी रविदादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.













