बांदा (मंगल कामत) : भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष, आमदार मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बांदा ग्रामपंचायतीचे सफाई कामगार, लाईट कर्मचारी तसेच होडी वाहक यांना भेटवस्तू व मिठाईचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजप महीला अध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, बांदा शहर अध्यक्ष निलेश नाटेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, निलेश उर्फ पापू कदम, माजी शहर अध्यक्ष बाबा काणेकर, संदीप काणेकर, उमेश पेडणेकर, सिद्धेश महाजन, शैलेश केसरकर, डींगणे माजी सरपंच नितीन सावंत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विकी कदम, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा सावंत, माजी सरपंच दिपक सावंत, संदीप बांदेकर, सिद्धेश नाईक, सागर सावंत,साहील कल्याणकर, प्रविण गाड,विजय गावकर, महेंद्र पालव, आदी उपस्थित होते.
बांदा येथील श्रीराम चौकात आयोजित कार्यक्रमात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मिठाई वाटप करण्यात आले. समाजाच्या दैनंदिन सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगार, लाईट कर्मचारी आणि होडी वाहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आला. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.












