सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी ना. नितेश राणे यांनी गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली. गणरायाच्या चरणी त्यांनी भक्तिभावाने पूजा – अर्चा करून जिल्ह्याच्या सुख – समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह कुटुंबीय व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.













