कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४७ च्या चतुर्थी तिथीला पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुवनेश्वरी रूपात सजली आहे. दशमहाविद्यांपैकी चौथ्या क्रमांकाची महाविद्या मानली जाणारी भगवती भुवनेश्वर ही काली कुळातील देवता आहे.
ज्याप्रमाणे भगवती काली सृष्टीच्या आधी अनादी कालाची शक्ती म्हणून प्रगट होते किंबहुना केली अस्तित्व हे असतेच तीच आदिशक्ती विश्वाच्या निर्मितीनंतर विश्वाच्या पालनासाठी महाविद्या भुवनेश्वरी होते. भुवन म्हणजे विश्व विश्वाची स्वामिनी म्हणून ही भुवनेश्वरी तिच्या हातात पाश अंकुश वरद अभय या मुद्रा आहेत अंकुश हा तिच्या नियंत्रण शक्तीचे तर पाश हा तिच्या नियमक शक्तीचे प्रतीक म्हणता येईल. त्रिनेत्रा अशीही भुवनेश्वरी देवी अथर्वशीर्ष मध्ये महाविद्या म्हणून तिला ओळखले जाते. भगवती भुवनेश्वरी चे बीज असणारे ऱ्हीं बीज तांत्रिक प्रणव म्हणून देखील संबोधले जाते.
आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई याच महाविद्या भुवनेश्वरी देवी स्वरूपात सजली आहे. त्रिभुवनामध्ये जिच्या सारखी करूणामय कुणी नाही अशी ही भुवनेश्वरी स्वरुपी जगदंबा तुम्हा आम्हा सर्वांवर कृपा करो हीच प्रार्थना!
श्री मातृ चरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तिकः











