चेअरमन गणपत वळंजू व सीईओ ईश्वरदास पावसकर यांची माहीती
फाेंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २८ सप्टेंबर रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन्न झाली. लाभांश वाटपातील सातत्य कायम ठेवत या वर्षीही संस्थेने सभासदांकरिता १३ टक्के लाभांष जाहीर करत संस्थेच्या सभासदांच्या तसेच असंख्य ग्राहकांच्या सहकार्यामुळे संस्था प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यात यशस्वी झाली असल्याचे सिध्द केले असून या बद्दल सर्व सभासदांचे, ग्राहकांचे व हितचिंतकांचे संस्थेचे अध्यक्ष गणपत वि. वळंजू, उपाध्यक्ष चंद्रशेखर र. कुशे तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
संस्थेस सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये निव्वळ नफा रू. २ कोटी ३० लाख मात्र इतका झाला आहे. पतसंस्थेच्या निव्वळ नफयामध्ये झालेली २०.४४ टक्के वाढ हि पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचविणारी आहे. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला असता सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर संस्थेने आपली घोडदौड चालू ठेवली असून त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षा अखेर संस्थेचे भाग भांडवल रू. ३ कोटी ६३ लाख, ठेवी रू. १५० कोटी ६५ लाख, कर्ज रू. १२७कोटी ०३ लाख, निधी रू. ११ कोटी ६४ लाख, गुंतवणूक रू. ४० कोटी ३२ लाख इतकी झाली आहे. तसेच संस्थेचे खेळते भांडवल रू. १७२ कोटी ६० लाखाचे झाले असल्याची माहीती संस्थेचे चेअरमन गणपत वि. वळंजू व मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांनी दिली.
सध्याच्या डिजिटल युगात वैश्य समाज पतसंस्था देखील मागे नसल्याचे दिसून येते. संस्थेचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एक संस्थेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. तंत्रज्ञानाची कास धरत संस्था कोअर बँकिंग सिस्टीम मध्ये काम करत आहे. संस्थेने मोबाईल अॅप, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, नेट बँकिंग, क्युआर, एसएमस अर्लट, ईनॅच, डोअर बँकिंग तसेच पासबुक प्रिंटींग या सारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पिग्मी संकलन हे पिग्मी मशिन बरोबरच मोबाईल अॅप व्दारे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात करून तत्पर व पारदर्शक सेवा देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. संस्था आर्थिक व्यवहार करण्याबरोबरच सामाजिक भानही चांगल्या प्रकारे जपत आहे. वाढती स्पर्धा लक्षात घेता सभासदाभिमूख योजना संस्था सातत्याने राबवित आहे. सभासदांना आधुनिक दर्जेदार सोयी सुविधा मिळाल्या पाहीजेत, आपला सभासद या पासून कुठेही मागे राहता नये याकरिता संस्था युध्द पातळीवर काम करत असून संस्थेच्या या आर्थिक घोडदौडीत संस्थेचे सर्व सभासद, ठेवीटार, ग्राहक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी तसेच असंख्य हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य व हातभार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणपत वि. वळंजू, उपाध्यक्ष चंद्रशेखर र. कुशे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा.पावसकर यांनी सांगितले.
आगामी काळात संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आचरा, रत्नागिरी जिल्हयामध्ये राजापूर व पाचल त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हयात राधानगरी व आजरा या ठिकाणी नवीन शाखा सुरू होत असून मार्च २०२६ पर्यंत रू. २०० कोटी ठेवींचे लक्ष गाठण्याचा संकल्प करण्यात आला असून लवकरात लवकर ठेवीचे उद्दीष्ठ गाठण्याकरिता सर्व सभासदांनी हातभार लावण्याचे आव्हान याअनुषंगाने करण्यात आले. यावेळी सभासदांनी संस्थेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त करत संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण सूचना करून संचालक मंडळ तसेच कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधींचे यांचे अभिनंदन केले. सभेसाठी मोठया संख्येने सभासदांनी उपस्थिती दर्शवित सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्याबाबत सर्व सभासदांचे आभार मानन्यात आले. यावेळी अध्यक्ष श्री. गणपत वि. वळंजू, उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर र. कुशे, संचालक श्री. दिलीप रा. पारकर, श्री. गणपत शं. पारकर, श्री. संजय धा. पेडणेकर, श्री. सुनिल श. डुबळे, अॅड. श्री. समिर प्र. वंजारी, उमेश स. वाळके,अनिता अ. रेवडेकर, रश्मी रा. माणगांवकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर उपस्थित होते.












