कळसुली गवसेवाडीतील विजवाहिनीवर पडलेली झाडे पावसाळ्यापूर्वी तोडा

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नाडिस यांची मागणी

अन्यथा कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथिल वीज पुरवठा करणाऱ्या विजवाहिनीवर झाडे अवकाळी पावसामुळे झाडे पडली असून, या धोकादायक झाडांन बाबत गावांतील ग्रामस्थांनी वायरमनला वेळोवेळी तोंडी सूचना दिल्यात मात्र वायरमनकडून दू्र्लक्ष ? केला जातो अशा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे. तसेच गावात नेहमीच वीजपुरवठा खंडित होतो. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. पावसाळ्यापूर्वी धोकादायकच असलेली झाडी तातडीने हटवा, अन्यथा कळसुली गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार येईल,असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नाडिस यांनी कॉलेटी कन्ट्रोल श्री.प्रकल्प येडगुळकर यांना निवेदनद्वारे दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नाडिस, किशोर चव्हाण, विठ्ल आर्डेकर, शुभम देसाई आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!