भालाफेक व गोळाफेक वेलांकिनी अटकेकर, थाळीफेक भाविका गुरव तर ३००० मिटर चालणे स्पर्धेत शर्वरी यादव तालुक्यात प्रथम
वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद,सिंधुदुर्ग यांचे मार्फत आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा वैभववाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे यांनी आपले वर्चस्व कायम अबाधित ठेवले. या स्पर्धेत भालाफेक व गोळा फेक या क्रीडा खेळ प्रकारात वेलांकिनी अटकेकर, थाळी फेक या क्रीडा प्रकारात भाविका गुरव, ३००० मिटर चालणे या क्रीडा प्रकारात शर्वरी यादव यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व कायम अबाधित ठेवले.
या यशाबद्दल संस्था व प्रशालेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.












