संकल्प फोटो स्टुडिओचे मालक सचिन सावंत यांची आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारपेठेतील संकल्प डिजिटल फोटो स्टुडिओचे मालक सचिन महादेव सावंत वय ४० रा. कुसूर पिंपळवाडी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोनाळी इनामत व्हाळ येथे घडली असून रविवारी सकाळी १० वाजता उगडकीस आली. त्यांच्या आकस्मिक मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.     

मयत सचिन सावंत हे दररोज सकाळी दुध आण्यासाठी कुसूर येथील आकाराम सावंत यांच्याकडे जात असत. नेहमीप्रमाणे ते रविवारी सकाळी सात वाजता घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडले होते. परंतु सकाळी नऊ वाजेपर्यंत घरी आले नाहीत. त्यांची आई मालती यांनी ही माहिती त्यांच्या शेजारी राहत असलेल्या नितीन शांताराम कुळये यांना सांगितली. नितीन आपल्या सोबत एका मित्राला घेऊन मोटार सायकलने कुसुर पिंपळवाडी ते वैभववाडीपर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांना ते कुठेही सापडलेले नाहीत.  त्यामुळे ते परत वैभववाडी ते कुसुरकडे निघाले. दरम्यान त्यांनी ते नेहमी दूध घेत असलेल्या आकाराम सावंत यांच्याकडे चौकशी केली. मात्र ते आज दुध आणायला आलेच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी ते उंबर्डेच्या दिशेने जात असता,  सोनाळी इनामत व्हाळ येथे रस्त्याकडेला सचिन याची सायकल उभी असल्याचे दिसले. त्यानी आजूबाजूला शोध घेतला असता जवळच असलेल्या व्हाळात एका जंगली झाडाला सचिन गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. ब्लाऊजचे कापड एकमेकाला बांधून त्यापासून तयार केलेल्या लांब कापडाने त्यांनी गळफास घेतला. याबाबत नितीन कुळये यांनी गावचे पोलीस पाटील यांना माहिती दिली. वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, हेड कॉन्स्टेबल गणेश भोवड, हरिष जायभाय, रणजित सावंत, श्री मेथे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षाची मुलगी व विवाहित बहिणी असा परिवार आहे.
सचिन सावंत हे वैभववाडी बाजारपेठेत संकल्प फोटो स्टुडिओचे मालक होते.गेली अनेक वर्षे ते हा व्यवसाय करीत होते. त्यामुळे तालुक्यात ते सर्वत्र परिचित होते. ते शांत, मनमिळावू व अतिशय संवेदनशील स्वभावाचे होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या अशा पद्धतीने झालेल्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!