तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत त्रिंबक हायस्कूलचे यश….!

आचरा (प्रतिनिधी) : पोईप हायस्कूल येथे दिनांक ३ आणि ४ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या मालवण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जनता विदयामंदिर त्रिंबक प्रशालेच्या १४ वर्षे मुली आणि १७ वर्षे मुली दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, सर्व संचालक मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, शिक्षक वर्ग, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, सर्वांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!