कनेडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ संपन्न झाली. माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्यु. कॉलेज कनेडी प्रशालेने सालाबादप्रमाणे यावर्षी राज्यस्तरीय वैयक्तिक क्रीडा प्रकारात राज्यात आपला दबदबा कायम ठेवत नावलौकिक मिळवला आहे. इयत्ता १२ वी विज्ञान मधील प्रज्योती जाधवने छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले असून तिची निवड जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. प्रज्योतीला क्रीडा स्पर्धेची आवड असून जिल्हास्तरावरील विविध क्रीडा प्रकारात तीने सुयश संपादन केले आहे. प्रशालेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून तीची ओळख निर्माण झाली आहे. सध्या ती तायक्वांदो स्पर्धेचा नियमित सराव करत आहे.
या यशस्वीतेसाठी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा. सतीशजी सावंत, संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत, शालेय समिती पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, मार्गदर्शक शिक्षक बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी, क्रीडा प्रेमी यांच्या कडून तीचे कौतुक व अभिनंदन होत आहे. तसेच तीला पुढील स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या.











