रिगल कॉलेजमधील 5 लाखांच्या चोरीचा एलसीबी ने केला पर्दाफाश

कॉलेजमधील शिपाई महिलेने ऐन दिवाळीत हातसफाई केल्याचे उघड

कणकवली (प्रतिनिधी) : जानवली येथील रिगल कॉलेज मधील कपाटातील 5 लाख 4 हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या त्याच कॉलेजमध्ये शिपाई पदावर काम करणाऱ्या संशयित महिलेला सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासाच्या ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या हवाली केले आहे. संशयित महिलेचे नाव मानसी मनीष तेली ( नाटळ राजवाडी) असून तिच्या राहता घरातून सोमवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. तसेच तिने या गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीतील काही रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. रविवार 19 ऑक्टोबर रोजी रिगल कॉलेज मध्ये चोरी झाली होती. याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल होती. याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्याकडे चौकशी केली असता तपास सुरू आहे असे सांगत अधिक माहिती सांगण्यास नकार दिला.

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांनी फी 18 ऑक्टोंबर रोजी कॉलेजमध्ये जमा केली होती. ती रक्कम मेडिकल कॉलेजमध्ये क्लार्क वृषाली परब यांनी जमलेली 6 लाख 42 हजार 101 रुपयांची रोख रक्कम कॉलेज किर्दी मध्ये नोंद करून लॉकर मध्ये ठेवली होती. तसेच त्यातील₹27,500 रुपयांचे रोख रक्कम कॉलेजच्या अकाउंट वर जमा केली होती उर्वरित 6,14,601 कपाटात ठेवले होते. 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी कॉलेजच्या आवारामध्ये एक महिला व एक अनोळखी व्यक्ती फिरताना ग्रामस्थांना मिळून आले होते. याबाबत ची माहिती कणकवली पोलिसांना देत त्या महिला व अनोळखी व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन दिले होते. यावरची माहिती क्लार्क वृषाली परब यांना दिली होती. त्यानंतर वृषाली परब व त्यांचे पती रुपेश परब यांनी कॉलेजमध्ये येऊन कपाटाची पाहणी केली असतात कपाटामध्ये केवळ 1 लाख 10 हजार रुपये मिळून आले होते. त्यामुळे वृषाली परब यांनी 5 लाख हून अधिक रक्कम चोरीस गेल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाणे दिली होती त्यानुसार अज्ञात चोरट्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी घन:शाम आढाव यांच्या सूचनेनुसार तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर सावंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे किरण देसाई ज्ञानेश्वर तवटे महिला कॉन्स्टेबल स्वाती सावंत तसेच कणकवली स्थानिक पोलीस यांनी तपास करण्यास सुरुवात केली.

कॉलेजमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना तपास करण्यास काही अडचणी आल्या मात्र तांत्रिक बाबींचा आधारे तपास केला. त्यात नाटळ राजवाडी येथील मानसी तेली यांनी चोरी केली असल्याची बाब समोर आली. तसेच ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी मानसी तेली व अन्य एका अनोळखी व्यक्तीला येथील ग्रामस्थाने संशय तिरत्या फिरात असल्याने पोलिसांच्या ताब्यात दिले होते ही बाबा पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर एलसीबी चे पथक नाटळ राजवाडी येथे जात संशयित मानसी तेली हिला ताब्यात घेतली. मानसी तेली हिच्याकडे चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिल्याचे समजत असून याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!